अम्मा म्हणायची की त्या लहानपणीच्या गावच्या ट्रिपांमध्ये होती सुरूवात!
पण खरंतर लालमातीचं वेड कधी मनात बसलं, कधी रक्तात घुसलं हे कळलच नाही.
वर्षे गेली, पण शोध काही संपेना.
बघता बघता, तेच वेड जणू काही घुसलं कुंडीत!
कोकणातल्या बागेचं स्वप्न मात्र जवळ येऊन सुद्धा हुलकावण्या देत राहिलं.
निराशेने मन भरलं आणि आयुष्याच्या अनेक झुंझीत गेलं ते वाहत.
मग एक दिवस उजाडला,
पुन्हा नव्याने मुंबईच्या एका छोट्याशा कोपऱ्यात ते जोपासायचं ठरलं
नेहेमी प्रमाणे अम्मा साथीदार.
आणल्या कुंड्या आणि लावली झाडं.
पाणी देणं, ऊन देणं, नव्याने ते पहात रहाणं,
हा हा म्हणता,
खिडकीतली आमची ही बाग आकाराला येऊ लागली
बघावं तेव्हा आता मन येते भरून.
फुलांमध्ये मन रमलं, जीव लागला,
रंगात रंगलो, सुवासाने घर दमदमलं
मन ओरडू लागलं, मोगरा फुलला-मोगरा फुलला.
कृष्णकमळ उमलले, गुलाब वाऱ्यावर डोलू लागले,
मोगरा फुलला, मिरच्या लागल्या,
फोटो-सेशन झाले.
कौतुक भरल्या डोळ्याने बघणे-दाखवणे पण झाले.
जाई-जुई डोलू लागल्या,
मोगरा फुलला-फुलला
आणि येतात त्या आठवणी मग अधून-मधून,
कारण, कोकणाच्या त्या बागेतला स्वप्न,
आजही खिडकीतल्या ह्या बागेत फुलत आहे!
Wah wah. 1 no. Kharach khup chaan
LikeLiked by 1 person
Thank you, thank you, just getting started 🙂
LikeLike