अम्मा म्हणायची की त्या लहानपणीच्या गावच्या ट्रिपांमध्ये होती सुरूवात! पण खरंतर लालमातीचं वेड कधी मनात बसलं, कधी रक्तात घुसलं हे कळलच नाही. वर्षे गेली, पण शोध काही संपेना. बघता बघता, तेच वेड जणू काही घुसलं कुंडीत! कोकणातल्या बागेचं स्वप्न मात्र जवळ येऊन सुद्धा हुलकावण्या देत राहिलं. निराशेने मन भरलं आणि आयुष्याच्या अनेक झुंझीत गेलं ते…